 |
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शंभर वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा.मि.हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेबु्रवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.
|